पेट्रोल-डीझेल दरवाढी ची लुट थांबवावी- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य


चांदोली-उखळू प्रतिनिधी : संपूर्ण देशभर पेट्रोल व डीझेल च्या दरवाढीने सामान्य जनतेची सुरु असलेली लुट थांबवावी, अशा मागणीचे निवेदन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी श्री गलांडे यांना दिले आहे.


सद्यस्थितीत पेट्रोल , डीझेल ची दरवाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही. डीझेल च्या दरवाढीने एसटी,बस ची दरवाढ जनतेच्या मानगुटीवर बसणार आहे, तर पेट्रोल ची दरवाढ सर्वसामान्य शेतकरी, नोकरदार यांना सुद्धा परवडणारी नाही. सद्यस्थितीत पेट्रोल डीझेल जीवनावश्यक गोष्टींमध्ये गणले जात आहे. परंतु शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. पेट्रोल डीझेल चे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, आणि हे जनतेला न परवडणारे आहे.
म्हणूनच केंद्रीय पेट्रोलियम विभाग, तसेच राज्य विक्रीकर विभाग यांना हे निवेदन तातडीने पोहचवून सामान्य जनतेची होणारी लुट त्वरित थांबवावी, अशी मागणी या तथागत ग्रुप च्यावतीने प्रशासनाला करण्यात येत आहे.


तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य , या सामाजिक संघटनेचे संस्थापक श्री संदीप भाऊ गवई यांच्या आदेशानुसार ,ग्रुप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष भाऊ बैलके यांच्या मार्गदर्शनानुसार हे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास भाऊ हुपरीकर यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. यावेळी निशांत कांबळे हातकणंगले तालुकाध्यक्ष, संग्राम कांबळे करवीर तालुकाध्यक्ष, अनिकेत कांबळे उपाध्यक्ष, प्रशांत कांबळे, मुरलीधर शिंगे, यांच्यासह अनेक शेतकरी , व तथागत ग्रुप चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!