पहिली शिवसेना आणि नंतर आघाडी-माजी आम.सत्यजित पाटील सरुडकर-आबा

शाहुवाडी प्रतिनिधी : शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रात फडकला पाहिजे. महाराष्ट्रात आघाडी आहे, परंतु पहिली शिवसेना आणि नंतर आघाडी . यासाठी शिवसेना ग्रामीण भागात तळागाळा पर्यंत पोहचली पाहिजे. यासाठी सेनेने केलेले कर्तुत्व जनमानसापर्यंत पोहोचविणे, हि सध्याची शिवसंपर्क अभियानाची गरज आहे. असे मत प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी शिवसंपर्क मोहिमेच्या शाहुवाडी तालुक्याच्या शुभारंभ प्रसंगी केले.

श्री सत्यजित पाटील पुढे म्हणाले कि, शिवसेनेत निष्ठेची किंमत नक्कीच होते. याचेच उदाहरण म्हणजे सेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची मुख्यमंत्री कोट्यातून गोकुळ च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यात ग्रामीण भागातील शिवसैनिकाला सुद्धा अनेक महामंडळांच्या पदांवर नियुक्त्या होवून, ग्रामीण भागाला न्याय मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शिवसैनिक प्रामाणिक आहे. आज जाधव यांच्या गोकुळ च्या निवडीमुळे तालुक्यातील शिवसैनिकाला एक भक्कम आधार मिळत आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत कोणतेही मतभेद नाहीत.आज गोकुळ मध्ये मुरलीधर जाधव जाणे, म्हणजे तिथे बिनवेसनेचा वाघ पोहचला आहे. त्यांनी शाहुवाडी, शिरोळ तालुक्याला दत्तक घ्यावे. दुध उत्पादकांना दर वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
दरम्यान शाहुवाडी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदी सोंडोली चे भीमराव पाटील यांची तर सदस्य पदी सेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांची निवड करण्यात आली आहे. तेंव्हा खऱ्या अर्थाने निराधारांना आधार देण्याचे काम भीमराव व नामदेव यांनी करावे. शिवसंपर्क अभियानाद्वारे शिवसेनेची कामे जनमानसापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

यावेळी मुरलीधर जाधव, भीमराव पाटील, नामदेव गिरी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुरलीधर जाधव म्हणाले कि, २७ वर्षे निष्ठेने केलेल्या कामाचे या नियुक्तीमुळे चीज झाल्यासारखे वाटत आहे. शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण व २० % राजकारण या सूत्री ने आजपर्यंत सामान्यांची कामे करत आलो आहोत. शिवसेना हि रस्त्यावरची संघटना आहे. हि सामान्य जनतेसाठी रस्त्यावर नेहमीच उतरत आली आहे. त्याचेच फळ म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी गोकुळ च्या संचालक पदी माझी नियुक्ती केली आहे.

दरम्यान भाजप सातत्याने मुख्यमंत्री साहेबांवर सातत्याने टीका करून, त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु उद्धवसाहेब भाजपवाल्यांना पुरून उरणारे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही ईडी आणा,नाहीतर आणि काही आणा, पण संपूर्ण भारतात यशस्वी मुख्यमंत्री ठरलेले उद्धवसाहेब डगमगणार नाहीत.

आज शिवसंपर्क मोहिमेद्वारे शिवसेनेची कामे आपल्या मतदारसंघात पोहचवा, असे आवाहन सुद्धा जाधव यांनी केले. भविष्यात सेनेचे ग्रामीण भागातून किमान चार आमदार शिवसेनेचे निवडून देण्यासाठी प्रयत्न करू या. दरम्यान १ ते ८ ऑगस्ट हा साप्ताह माझा गाव, कोरोना मुक्त गाव हे अभियान यशस्वी करायचे आहे. असेही आवाहन श्री जाधव यांनी केले.

दरम्यान शिवसेनेचे माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, पंचायत समिती चे सभापती विजय खोत, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, आण्णासाहेब भिलवडे आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

कार्यक्रमाचे स्वागत तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, डॉ. स्नेह जाधव, जालिंदर पाटील रेठरेकर, सुरेश पारळे, अमरसिंह पाटील कडवेकर, अमरसिंह पाटील भेडसगावकर, शिंपे येथील कृष्णा पाटील, बाजीराव पाटील, विष्णू कारंडे, योगेश कुलकर्णी, संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे, माजी जि.प.सदस्य नामदेवराव पाटील सावेकर, राजू भोपळे, जोतीबा चे शिवाजीराव सांगळे, शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या मंगलाताई चव्हाण, दीप्ती कोळेकर, तालुका आघाडीप्रमुख अलका भालेकर, सुवर्णा दाभोळकर, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन दत्तात्रय लोहार यांनी केले.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!