” निराधारांना आधार देवू ” – श्री भीमराव पाटील सोंडोलीकर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना


शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेंतर्गत, पात्र लाभार्थ्यांची १५७ प्रलंबित प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, भविष्यात पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून खऱ्या अर्थाने निराधारांना आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना शाहुवाडी तालुका समिती चे अध्यक्ष भीमराव पाटील सोंडोलीकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


ते पुढे म्हणाले कि, हे अध्यक्ष पद सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी स्वीकारले आहे. यासाठी आमचे नेते माजी आम.सत्यजित पाटील सरुडकर यांनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली असून, ती वाया घालवणार नाही. संजय गांधी निराधार योजना खऱ्या अर्थाने निराधार लाभार्थ्यांसाठी आहे. मागील प्रलंबित १५७ प्रकरणे पहिल्याच बैठकीत मंजूर करण्यात आली आहेत. भविष्यात पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करावी. दरम्यान श्रावण बाळ योजनेतील ४९, तर इंदिरा गांधी योजनेतील २ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.


दरम्यान कोणत्याही राजकीय गटातटाचा विचार न करता, स्थानिक स्तरावर कार्यरत समिती तसेच तलाठी यांच्यामार्फत आवश्यक कागदपत्रे देवून प्रकरणे सादर करावीत. योग्य प्रकरणांना मंजुरी देवून सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत.


यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले कि, प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी संजय गांधी निराधार समिती ची बैठक तहसीलदार कार्यालयात संपन्न होणार आहे.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!