वाडीचरण,थेरगाव या नदीकाठच्या गावांना श्री बोरगे यांची भेट

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पिशवी जिल्हापरिषद मतदार संघात पावसाने कहर केल्याने मतदारसंघात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले. यामध्ये महत्वाचे म्हणजे वाडी चरण व थेरगाव हि गावे नदीकाठी असल्याने सगळ्यात अगोदर पुराचा फटका या गावांना बसतो. याठिकाणी जि.प. सदस्य विजयराव बोरगे यांनी या गावांना भेट देवून पाहणी केली.
या पाहणी नंतर ग्रामस्थांना धीर देत ,आवश्यक त्याठिकाणी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. श्री बोरगे व माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी कोरोना काळात प्रशासनाला सगळ्यात अधिक सहकार्य केले आहे. वाडी वस्तीवरील लोकांना मास्क, सॅनीटायझर पुरवून लोकांचे कोरोना पासून रक्षण केले आहे.


त्यानंतर लगेच पूरपरिस्थिती आली. यावेळी सुद्धा श्री बोरगे, गाव ते गाव पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे, महापुरामुळे पडझड झालेल्या घरांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर स्थलांतरित कुटुंबांना धीर देण्याचा प्रयत्न श्री बोरगे करीत आहेत.

येथील वाडीचरण, व थेरगाव गावात तलाठी, ग्रामसेवक आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून त्यांनी नदीकाठच्या गावांची पाहणी केली.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!