कणा मोडलेल्या शेतकऱ्याला आधार कोणी देईल का ? -शाहुवाडी चा उत्तर भाग


शित्तूर तर्फ वारुण ( मनीष नांगरे ) : शाहुवाडी तालुक्याचा उत्तर भाग म्हणजे शित्तूर तर्फ वारुण परिसर . डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेला भाग एरव्ही निसर्ग संपन्न म्हणून ओळखला जातो. पण याच निसर्गाने रौद्र रूप धारण केल्यावर जेंव्हा होत्याचं नव्हतं, होतं. तेंव्हा मात्र पायाखालची जमीन घसरते.


चांदोली धरणापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शित्तूर वारुण गावाच्या आसपास पावसाने थैमान घालून, अवघ्या दोन-तीन दिवसात हाहाकार माजवला.


इथं सध्या झालेल्या पावसाने १९५२ पासून झालेल्या सगळ्या पावसाचे रेकोर्ड ब्रेक केले आहेत. अशी येथील ज्येष्ठ नागरीकातून चर्चा आहे. शित्तूर व शिराळा तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या ‘ बाद्याचा माळ ‘ या रस्त्यापासून डोंगरापर्यंत पसरलेल्या सुमारे पंधरा ते वीस एकर शेतातील भातशेतीवर निसर्गानेच घाला घातला आहे. जवळपास २ किलोमीटर अंतरावरून डोंगरदरा कोसळत आला. पावसामुळे प्रचंड पाण्याचा प्रवाहाने मोठमोठी झाडे, झुडपे, दगड-माती यांचा अक्षरशः खच पडला आणि होत्याचे नव्हते झाले.मुळात शेती म्हणजे जीकरीचा व्यवसाय असून, पदरमोड करून केली जाते. आणि अशा शेतीवर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून घाला घातला जातो. आज अतिवृष्टीने ‘ ती ‘ भूमिका बजावली, आणि शेतकऱ्याची शेती नेस्तनाबूत झाली. हिरव्यागार हिरवळीवर आज वाळवंट पसरलं आहे.


कणा मोडलेल्या शेतकऱ्याला शासन आधार देईल का? अशीच अपेक्षा जनमानसातून केली जात आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!