oppo कंपनीचा ” RENO6…5G ” हे नवे मॉडेल फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये उपलब्ध

बांबवडे : सध्या तरुण वर्ग नोकरी च्या मागे लागण्या व्यतिरिक्त व्यवसायाकडे देखील वळू लागला आहे. हि समाधानाची बाब आहे. शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल कुमार लाटकर हा तरुण सुद्धा या मोबाईल शॉपी च्या माध्यमातून व्यवसायात उतरत आहे. बांबवडे मध्ये पिशवी रोड च्या सुरुवातीलाच त्यांचे दुकान आहे.

फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर म्हणाले कि, आज दि.२९ जुलै रोजी oppo कंपनी चा RENO 6… 5G हे लेटेस्ट मॉडेल लाँच होत आहे. ह्या नव्या मोबाईल स्मार्ट फोन ची उपलब्धता फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये आहे. इतर अनेक कंपन्यांच्या मोबाईल सोबत आजपासून हा नवा कोरा RENO 6… 5G मोबाईल सुद्धा उपलब्ध आहे.


यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा बजाज फायनान्स कंपनी च्या माध्यमातून करून देण्यात येत आहे. त्यामुळे अगदी सुलभ हफ्त्यांवर हा मोबाईल आपल्या ग्राहकांना उपलब्ध होत आहे. बांबवडे सारख्या बाजारपेठेत पहिल्यांदाच लाँच होणारा RENO 6… 5G मोबाईल, फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये उपलब्ध आहे.


याच बरोबर मोबाईल एक्स्चेंज ऑफर सुद्धा इथं उपलब्ध आहे. फक्त ३ कागदपत्रांसोबत त्वरित कर्ज मंजूर करून देण्याची सुविधा सुद्धा, बजाज फायनान्स च्या माध्यमातून उपलब्ध आहे.

दरम्यान याठिकाणी अर्जंट मोबाईल रिपेरिंग ,मेमरी कार्ड, सर्व प्रकारचे चार्जर, फँसी मोबाईल कव्हर, हेडफोन, आणि ऑल एक्सेसरीज इथं सहज उपलब्ध आहेत. तसेच इथं मोबाईल रिपेरिंग करताना, आपला मोबाईल दागिना समजून इथं काम केलं जात आहे. अशी हि माहिती मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांनी ‘ एसपीएस न्यूज ‘ शी बोलताना सांगितले.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!