श्री सुरज बंडगर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती


बांबवडे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी सुरज मारुती बंडगर राहणार बांबवडे तालुका शाहुवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती च्या अनुषंगाने तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने सुरज बंडगर यांचे हार्दिक अभिनंदन.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील तरुण वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी हि नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, नाम. जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री नाम. हसन मुश्रीफ, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, अशोकराव जांभळे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, युवक प्रदेशाध्यक्ष नावेद मुश्रीफ, यांच्या मार्गदर्शनाखाली व मानसिंगराव गायकवाड दादा यांच्या सूचनेनुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!