बांबवडे आरोग्यवर्धिनी साठी ४.६८ कोटी मंजूर : श्री विजयराव बोरगे जि.प.सदस्य ” आपलं माणूंस “


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बांबवडे येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी इमारती च्या बांधकामासाठी ४ कोटी ६८ लाखाचा निधी येथील जिल्हा परिषद सदस्य श्री विजयराव बोरगे पैलवान यांनी मंजूर करून आणला आहे. याबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.श्री विजयराव बोरगे हे जिल्हा परिषद नियोजन समिती वर सदस्य असून, त्यांनी तेथील फंडातून हा निधी मंजूर केला आहे.


विजयराव बोरगे यांनी बांबवडे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक चुलीपर्यंत पोहचण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोविड च्या काळात या व्यक्तीने तहान भूक हरपून वाडी वस्ती वरच्या लोकांना मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमिटर, थर्मल गन आदी साहित्यांचा पुरवठा करून, लोकांना या महामारीपासून दूर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.


येथील आरोग्यवर्धिनी साठी अँब्युलंस इतर आरोग्य तपासणीसाठी गावोगाव फिरविल्या आहेत. हि व्यक्ती खऱ्या अर्थाने इथल्या जनतेला ” आपलं माणूंस ” वाटू लागाली आहे. आजवर अनेक मंडळींनी या पदावर कामे केली आहेत. परंतु सद्यस्थितीत मात्र विजयराव बोरगे हे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते मानसिंगराव गायकवाड दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेली राजकीय कारकीर्द आज खऱ्या अर्थाने नावारूपाला येवू लागली आहे. केवळ राजकारण नव्हे तर समाजकारणाशी देखील, हे व्यक्तिमत्व स्वत:चं जनतेशी असलेलं वेगळं नातं सिद्ध करीत आहे. येथील आरोग्य केंद्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, मतदार संघातील आयाबहीनींशी असलेलं माणुसकीचं नातं प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत.


जिल्हा परिषद मध्ये तालुक्यातील कोणीही व्यक्ती कामासंदार्भाने गेल्यास, हे जातीनं त्या माणसाची विचारपूस करतात, आणि त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करतात. अशा या निगर्वी व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने सलाम. कारण राजकारण हे, नेहमी करायचंच आहे, पण समाजकारण हे त्यापेक्षा कितीतरी मोठं समाधान देवून जातं, असं श्री बोरगे यांचं मत आहे. श्री विजयराव बोरगे यांना श्री विक्रम पाटील ,रवींद्र पाटील थेरगाव आणि त्यांच्या मित्र परिवाराने शुभेच्छा तर दिल्यात,परंतु अभिनंदन सुद्धा केले आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!