शासकीय नोंदणीकृत असलेल्या GCC-TBC कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्येच प्रवेश घ्या


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात GCC-TBC कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट नोंदणीकृत असलेल्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवून, आपले भवितव्य निश्चित करावे. कारण सध्या काही इतर संस्था ज्या नोंदणीकृत नसून, GCC-TBC कॉम्प्यूटर साठी कमी फी आकारून विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. परंतु या संस्थांमध्ये त्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र नाहीत. अशी जुजबी प्रमाणात शिक्षण घेतलेली मंडळी प्रशिक्षण देत आहेत. यामुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी ” कमी फी ” च्या कारणास्तव आपण तिथे जरी प्रवेश घेतला तरी उत्तीर्ण होत नाही. हि वास्तवता आहे.
अशा बोगस संस्थांचे बांबवडे ता. शाहुवाडी इथं मात्र पेव फुटू लागले आहे. अशा संस्थांचा शासकीय स्तरावर सुद्धा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी नोंदणीकृत संस्थांची आहे.


सध्या GCC-TBC कॉम्प्यूटर प्रशिक्षण देणाऱ्या बोगस संस्थांचे पेव फुटले आहे. अशा संस्थांपासून विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी सावध रहावे. कमी फी आकारून या संस्थांमध्ये प्रवेश दिला जात आहे. परंतु योग्य दर्जाचे प्रशिक्षण त्यांना देता येत नाही. कारण त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्याकडे नसते. जर विद्यार्थ्यांना तपासायचे असेल, तर त्यांना किती स्पीड ची परीक्षा दिली आहे, हे विचारा. तुम्हाला समजून येईल कि, त्यांची शैक्षणिक पात्रता तुम्हाला समजून येईल. आणि ज्यांची स्वत:ची शैक्षणिक पात्रता नाही, त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या दर्जाचे प्रशिक्षण मिळेल,याची कल्पना करा.


बोगस GCC-TBC कॉम्प्यूटर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांपासून सावध रहा, आणि शासकीय नोंदणीकृत असलेल्या संस्थांमध्येच प्रवेश घ्या. केवळ ‘ कमी फी ‘ या भूल भुलैया ला बळी न पडता, खऱ्या अर्थाने शासकीय अभ्यासक्रमाने प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच प्रवेश घ्या, आणि आपले भवितव्य घडवा.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!