संजय जगताप सर यांना रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटी ची डॉक्टरेट पदवी बहाल

शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा माण चे पदवीधर अध्यापक श्री संजय शंकर जगताप यांना रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटी बोस्टन अमेरिका या विद्यापीठामार्फत शिक्षण शास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. शाहुवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमधून सर्वप्रथम पीएचडी मिळविण्याचा मान श्री जगताप यांनी मिळवला आहे. याबद्दल पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांचे मनापासून अभिनंदन.


श्री जगताप हे महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. तसेच त्यांनी शाळा सिद्धी राज्य निर्धारक म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांना इंग्रजी परिषदेमध्ये आउट स्टँडिंग प्रेझेन्टेशन अॅवार्ड मिळाले आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित सिंगापूर देशाचा शैक्षणिक अभ्यास दौरा यशस्वी पूर्ण केला आहे.


सतत शैक्षणिक कामात मग्न रहाणे, हा त्यांचा स्वभाव आहे. नवनवीन शिकत रहाणे, या त्यांच्या स्वभाव वैशिष्ठ्यामुळे या लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाबरोबर च स्वत:देखील, आपली स्वत:ची शैक्षणिक पात्रता अधिकाधिक वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. या लॉकडाऊन काळामध्ये त्यांनी दोन विषयातून पदवी हे शिक्षण सुरु ठेवले आहे.


संजय जगताप हे शैक्षणिक क्षेत्रांमध्ये एक उपक्रमशील शिक्षक म्हणून सर्व परिचित आहेत. त्याचबरोबर सामाजिक कामांमध्ये देखील ते हिरीरीने सहभाग घेत असतात. ८ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई इथं एका शानदार समारंभात श्री जगताप यांना डॉ.अनुष्क अय्यर असोसिएट डायरेक्टर रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटी, डॉ.पवनकुमार भूत असोसिएट, डायरेक्टर रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटी, प्रमुख पाहुणे अभिनेता चंकी पांडे, अभिनेत्री सिमरन अहुजा, भाग्यश्री पटवर्धन, अनंत महादेवन यांच्या उपस्थितीत डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!