स्वॅब चुकविण्यासाठी नागरिकांची पळापळ : मलकापूर येथील घटना


शाहुवाडी प्रतिनिधी : कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तपासणी मोहीम गतिमान केली असून, सुट्टी च्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी सुरु केल्याने पर्यटकांची धावपळ उडाली.


मलकापूर-अनुस्कुरा मार्गावर रुग्णवाहिकेत च स्वॅब तपासणी केली जात होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हि मोहीम गतिमान करण्यात आली होती.


कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष सतर्कता घेतली आहे. रविवार व सुट्टी च्या दिवशी वाहनांची वर्दळ त्याचबरोबर पर्यटकांचीही वर्दळ सुरु असते. या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात पोलीस चौकीजवळ त्याचबरोबर मलकापूर अनुस्कुरा मार्गावर मंगळवार पेठ इथं तपासणी केली जात होती.


दरम्यान स्वॅब चुकवण्यासाठी अनेकांची धावपळ झालेली पहायला मिळाली. स्वॅब घेत असल्याची खबर शहरात पसरली आणि अनेकांची धावपळ उडाली. दुचाकी धारकांची , तसेच चार चाकी धारकांची मार्ग काढून पळून जाण्यासाठी धावपळ झाली. या मोहिमेत मलकापूर नगरपरिषद चे श्री माने यांच्यासह नगर परिषद चे कर्मचारी, शाहुवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!