केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून , त्यांना स्थानिक कोर्टात नेण्यात येणार आहे.

नारायण राणे यांच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५,१५३ (अ ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द काढल्याने विविध शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यांच्याविरोधात नाशिक , महाड, आदी शहरात तक्रारी दाखल केल्या गेल्या. या अनुषंगाने दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली.

दरम्यान राणे यांनी एक महिन्यापूर्वीच मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

दरम्यान राणे यांनी अटकपूर्व जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने देखील तत्काळ सुनावणी देण्यास नकार दिला, यामुळे केंद्रीय सूक्ष्म ,लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे.