” गुरुनाथ ऑटोमोबाईल ” समोर सुमारे एक फुट खोलीचा खड्डा


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं मलकापूर दिशेला गुरुनाथ ऑटोमोबाईल समोर सुमारे एक फुट खोलीचा खड्डा गेल्या तीन महिन्यांपासून पडला आहे. परंतु अद्यापही राष्ट्रीय महामार्ग याकडे लक्ष देत नाही. कोणाचातरी अपघात होवून,मेल्याशिवाय हि मंडळी लक्ष देणार नाहीत का ? असा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडला आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून हा खड्डा पडला असून, याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असेच वाटायला लागले आहे. दरम्यान अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे इथं सखल भाग असल्यामुळे पाणी साचून रहाते, त्यामुळे पाण्यात किती खोलीचा खड्डा आहे याची जाणीव वाहन चालकाला होत नाही.


यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. हे आर्थिक नुकसान वाहन चालत सोसत आहे. परंतु यातून जीवितहानी होणार नाही,याची खात्री देता येत नाही. म्हणजेच जीवितहानी झाल्यानंतरच शासन याकडे लक्ष देणार का ? चारचाकी वाहन केवळ आर्थिक नुकसान सोसत आहेत. परंतु दुचाकी वाहनांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यास कोण जबाबदार असा प्रश्न वाहनचालकांतून विचारला जात आहे.


यावर लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून कार्यवाही करावी, अशीच अपेक्षा सामान्य जनतेची आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!