सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव- गणेश मंडळ सावर्डे खुर्द


बांबवडे : गणेश मंडळ म्हंटलं कि, अनेकांना वाटतं कि, तरुण पोरं, आणि धांगडधिंगा. असं नाही. तरुणाई बदलत आहे. . सामाजिक बांधिलकी कडे वळत आहे. अशा तरुण पिढीचे कौतुक करणे, आपले सर्वांचे कर्तव्य आहे. कारण याच तरुण पिढी मधून उद्याचा समाज निर्माण होत असतो. नेमकं हेच शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द येथील गणेश तरुण मंडळाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. निश्चित या तरुण मंडळाचे पदाधिकारी, संचालक मंडळ व सर्व सदस्य आणि ग्रामस्थांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज च्या वतीने मनापासून अभिनंदन .


या तरुण मंडळाने सध्याच्या कोरोना महामारी च्या काळात ज्या गोष्टी आयुधं म्हणजेच बचावात्मक शस्त्र ठरले, ते म्हणजे सॅनीटायझर, मास्क, तापमान तपासण्याचं मशीन इ. वस्तूंचे वाटप केले. आपल्या मंडळात येणाऱ्या सर्वांची तपासणी केली. आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधीलकीचं दर्शन घडवतात.


गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे हा सुद्धा मूळ हेतू होता. असाच गणेशोत्सव सर्वच मंडळींनी साजरा करावा, जेणेकरून समाज सुदृढ होईल.


यासाठी शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख यशवंतराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!