“असे शहीद खूप होतात, म्हणून काय तुमच्याकडेच पहायचे ?” -एका पोलीस कर्मचाऱ्याचे वीर मातेशी उध्दट वर्तन


बांबवडे : असे शहीद खूप होतात , तुमचाच एकटीचा मुलगा शहीद झालेला नाही. शहीद झाला म्हणून काय झालं, फक्त तुमच्याकडेच पहायचं काय आम्ही ? आम्हाला काय दुसरी कामे नाहीत काय ? असं वक्तव्य एका पोलीस कर्मचाऱ्याने,
एका वीर मातेशी करावं, सेच पोलीस अधिकाऱ्यानेसुद्धा तोच अविर्भाव ठेवावा, हे या देशाला नामुष्कीजनक आहे. हि व्यथा आहे पुनवत तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील एका वीर मातेची. हि व्यथा, एका वीर मातेने ‘, एका वीराच्या बहिणीने एसपीएस न्यूज शी बोलताना मांडली.


श्रीमती शशीकला भगवान माने यांचा एकुलता एक मुलगा नानाश्री भगवान माने हे बीएसएफ मध्ये जवान होते. २८ सप्टेंबर २०२० ला ते शहीद झाले. नानाश्री माने यांना लहान मुलगा आहे. तो त्याच्या आईसोबत त्यांच्या माहेरी राहतो. आणि पुनवत इथं एकट्या श्रीमती शशीकला माने रहातात. नानाश्री यांच्या आठवणींसोबत त्या जीवन कंठीत आहेत. दरम्यान भेडसगाव येथील काही मंडळी श्रीमती माने यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ करतात. म्हणून त्यांनी शिराळा पोलीस ठाणे इथं तक्रार दिली. यानंतर तेथील पोलीस ठाण्यातून सुद्धा त्यांना बोलविण्यात आले. त्यावेळी फोनवरून सुद्धा कोणी पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा हेच सांगितले. तुमचाच मुलगा शहीद झालाय काय ? असे लई शहीद होतात. या फोनवरून संभाषण झाल्यानंतर त्या पोलीस ठाण्यात गेल्या. त्या अशिक्षित असल्याने त्यांच्याकडून सही करून घेतली. त्यावेळी त्यांना काहीही वाचून दाखविण्यात आले नाही. ती आरोपी मंडळी सहीसलामत सुटून गेली. या घटनेमुळे त्यांना मानसिक धक्का बसला. त्या शुगर च्या पेशेंट आहेत. या धक्क्यामुळे त्यांची शुगर वाढली. त्यांची एक मुलगी बांबवडे तालुका शाहुवाडी इथे रहाते. त्यांनी या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.


दरम्यान दि.२७ सप्टेंबर रोजी शिराळा पोलीस ठाण्यात श्रीमती माने व त्यांच्या मुलीला बोलविण्यात आले. इथं सुद्धा तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी श्रीमती माने यांच्याशी एकेरी बोलून त्यांची अवहेलना केली. आणि कढी म्हणून कि काय, हे प्रकरण मिटवा असे सांगून अर्ज तयार केला. आणि यावर सही केल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असा दम त्यांच्या मुलीला पोलीस अधिकाऱ्यांनी फोनवरून दिला. यावेळी मुलगी सुद्धा न डगमगता म्हणाली कि, तुम्ही कारवाई करा, योग्य ते उत्तर देवू, असे त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.


हि व्यथा किंवा तक्रार काहीही असो. एका पोलीस अधिकाऱ्याचे शहीद जवानाविषयी असेही वक्तव्य असू शकते, हे ऐकून धक्काच बसला. एक माता आपला मुलगा देशासाठी अर्पण करते, आणि देशातील प्रशासन त्या मातेबाबत काय भावना ठेवते, हे विचार करण्यासारखे आहे.


आमचे पोलीस अधिकाऱ्यांना हेच सांगणे असेल, जेंव्हा एक माता आपला मुलगा बलिदान करते, तर देशाने त्या मातेचे साधे संरक्षण सुद्धा करू नये, हि पोलीस खात्यासाठी लांच्छनास्पद बाब आहे. यासाठी समाजातून आवाज उठला पाहिजे. पोलीस मंडळी किंवा अन्य कुणीही असो, त्यांची हिम्मतच कशी होते, कि वार्धक्याकडे झुकलेल्या एका वीर मातेला अशी वागणूक देण्याची ? आणि प्रशासन मात्र ढिम्म आहे.


एक देशासाठी बळी जातो, आणि काही, आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, हेच या देशाचे दुर्दैव. देशभक्ती आहे कुठे ? हा प्रश्न निर्माण व्हावा, हे या समाजाचे, पर्यायाने देशाचे दुर्दैव आहे.

दरम्यान शहीद नानाश्री माने यांना आज २८ सप्टेंबर २०२१ हा त्यांचा शहादत चा दिवस आहे. त्या वीर जवानाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने मानाचा मुजरा….

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!