सह्याद्री च्या कन्येची हिमशिखराकडे झेप : डॉ.तृप्ती वाघमारे यांना डॉक्टरेट प्रदान


बांबवडे : आपल्या मुलाने अथवा मुलीने अभूतपूर्व यश प्राप्त केले कि, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. विशेषकरून मध्यमवर्गीय समाजातील हि मुलं असली कि , मग तर खूपच अपूर्वाई होते. इथं तर आई-वडिलांसहित मित्र मंडळी, नातेवाईक, हितचिंतक यांचा देखील आनंद गगनात मावेनासा होतो. आणि मग होते अभिनंदनाची बरसात. गाठले जाते कौतुकांचे हिमशिखर. नेमकं हेच घडलंय आपल्या शाहुवाडी तालुक्यातील सोनवडे गावात. येथील उत्तम पांडुरंग वाघमारे यांची कन्या डॉ. तृप्ती उत्तम वाघमारे यांना डॉक्टरेट पदवी डॉ. जी. डी. पोळ फौंडेशन व आय.एम.टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल खारघर यांच्याकडून प्रदान करण्यात आली आहे. या बद्दल डॉ.तृप्ती वाघमारे यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.


खरंच हा दिवस त्यांच्या आई वनिता व वडील उत्तम वाघमारे यांच्यासाठी सुवर्णदिन ठरावा. एकेकाळी मुलगी नकोशी असा मानणाऱ्या समाजाला खऱ्या अर्थाने चपराक बसावी,असेच हे कर्तुत्व आहे.आज डॉ. तृप्ती यांनी अवघ्या वाघमारे परिवारालाच नव्हे, तर शाहुवाडी तालुक्यासाहित कोल्हापूर जिल्ह्याला देखील अभिमान वाटावा, असेच हे कर्तुत्व आहे.
एकेकाळी ‘ चूल आणि मुल ‘ च्या जोखडात अडकलेला आपला समाज आज उत्तुंग गगन भरारी घेत आहे, हेच यावरून दिसून येत आहे. दरम्यान उत्तम वाघमारे हे मध्यमवर्गीय कुटुंबातील सोज्वळ व्यक्तिमत्वं. समाजाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर. समाजासाठी काहीतरी करायची नेहमीच धडपड, असणारी हि व्यक्ती स्वत:च्या कुटुंबाकडे सुद्धा तेवढ्याच सजग बुद्धीने पहात होती. मुलगी हे परक्याचं धन, असं मानणाऱ्या समाजाला मुलगी सुद्धा मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक काही करू शकते, हे डॉ.तृप्ती यांनी समाजाला दाखवून दिले आहे. राखेतून निघालेली ठिणगी सुद्धा एक दीपस्तंभ बनू शकते, फिनिक्स पक्षाची भरारी सुद्धा कमी पडेल, असेच हे कर्तुत्व आहे. कारण उत्तम वाघमारे यांना आम्ही फार पूर्वीपासून ओळखत आहोत.डॉ. बापूसाहेब कांबळे सर यांच्या सहवासातून झालेली ओळख जरी असली, तरी अनेक चांगल्या माणसांचा सहवास नेहमीच आसमंतात सुगंध पसरवत असतो. उत्तमराव नेहमीच कामात मग्न असणारे व्यक्तिमत्व, स्वत;च्या दारात प्राजक्त फुलवीत होते, हे त्यांच्या कन्येने डॉक्टरेट पदवी मिळविल्यानंतर कळाले. असो.
बुद्धवासी पांडुरंग दाजी वाघमारे आणि आयुष्यमती लक्ष्मी पांडुरंग वाघमारे यांची नात, डॉ.तृप्ती यांनी यशाच्या अवकाशात गरुडभरारी घेतली आहे, याबद्दल त्यांचे पुनश्च अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.


दरम्यान डॉ. बापूसाहेब कांबळे सर आणि त्यांचे सहकारी यांनी देखील डॉ.तृप्ती यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


डॉ.तृप्ती यांच्या यशासाठी रंगराव वाघमारे, प्रीतम वाघमारे, अमर तुकाराम वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान सोनवडे येथील पंचशील तरुण मंडळाने देखील डॉ.तृप्ती यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!