अखेर वीर मातेच्या तक्रारीला तोंड फुटले : पाच जनांना अटक , खाकी सावरली


बांबवडे( दशरथ खुटाळे ) : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पुनवत येथील शहीद नानाश्री माने यांच्या मातेने शिराळा पोलीस ठाण्यात काही मंडळींविषयी शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. त्या मंडळींना शिराळा पोलीस ठाण्याने नाईलाजास्तव आज अटक केली आहे. आणि अखेर नाईलाजाने का होईना, शिराळा पोलीस ठाण्याने संबंधितांना अटक करून खाकी वर्दी ची लाज राखली.


नाईलाजास्तव म्हणावे लागत आहे, कारण सुमारे एक महिन्यानंतर या प्रकरणाला वेग आला. पोलीस अधिकाऱ्यांनी अखेर स्वत:वर आलेला दबाव झुगारत कायद्याची अंमलबजावणी केली. यासाठी त्या वीर मातेला ,आणि भगिनी ला मात्र पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागले. या प्रकरणात फिर्यादीला आपणच आरोपी आहोत का, असे वाटू लागले होते. पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सुरेश चील्लेवार यांनी तर माता-भगिनींना जवळ जवळ तुरुंगात टाकायचे च बाकी ठेवले होते. परंतु शिराळा तालुक्यातील मराठीयन च्या एका हिम्मतबाज पत्रकाराने हे प्रकरण लावून धरले,आणि खऱ्या अर्थाने त्या माता भगिनींच्या तक्रारीला वाचा फुटली. दरम्यान या प्रकरणात घरगुती भांडण असे वळण लावण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, त्यासाठी अगोदर कोणतीही तक्रार नसलेल्या वीर पत्नींना सुद्धा हे प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न झाला, असे कधी घडू नये, अशी कामे येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. असो. शेवट गोड होणे,म्हणजे त्या मंडळींना पोलीस ठाण्याने अटक केली. अनिकेत नथुराम पाटील वय ३० वर्षे, राहणार आकुर्ळे , सुकुमार हंबीरराव पाटील वय ४२ वर्षे, अमर हंबीरराव पाटील, वय ४० वर्षे, संतोष रंगराव कांबळे वय३५ वर्षे, राहणार भेडसगाव तालुका शाहुवाडी, विलास बापू गायकवाड राहणार फुपिरे तालुका शिराळा जि. सांगली, यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान शेत व जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून या मंडळींनी शिवीगाळ केल्याचे पोलिसांच्या अहवालात सांगितले आहे.


एकंदरीत उशिरा का होईना वीर मातेच्या तक्रारीला तोंड फुटले आहे. अबला नारी केवळ अबला नसते, तर वेळ पडल्यास टी रणरागिणी सुद्धा होते, कारण भारतमातेच्या कुशीतून त्यांनी जन्म घेतला आहे.त्यांना कमी समजण्याचा कोणीही गैरसमज करून घेवू नये. हेच या प्रकरणावरून दिसून येत आहे.


दरम्यान पोलिसांच्या या कारवाई चे वीर माता व भगिनी ने स्वागत केले आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!