मानवाधिकार संघाची पुनवत च्या वीर माता-भगिनींना भेट

बांबवडे(दशरथ खुटाळे ) : राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा सेवा संघ सांगली च्या पदाधिकाऱ्यांनी पुनवत येथील वीर माता शिवीगाळ प्रकरण संदर्भात वीर माता व भगिनींची कापशी तालुका शाहुवाडी इथं त्यांच्या घरी जावून भेट घेतली.


यावेळी या शिवीगाळ प्रकरणासंदर्भात त्यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रकरण मधील त्यांची सत्यासत्यता त्यांनी पडताळून पहिली. तसेच हे प्रकरण मितावाण्यासंदर्भात देखील विचारणा करण्यात आली. या चर्चेत एसपीएस न्यूज चे मुकुंद पवार, दशरथ खुटाळे, बीपीएन चे रमेश डोंगरे हे देखील सहभागी होते.


यावेळी मानवाधिकार सेवा संघ सांगली चे उपकार्याध्यक्ष मच्छींद्र पवार, जिल्हाध्यक्ष ग्रामीण तानाजी पवार, महासचिव संतोष पाटील, कोषाध्यक्ष संतोष चव्हाण, तालुका उपाध्यक्ष धोंडीराम कुंभार, योगेश कोरगावकर, महेश पाटील, राजू घोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!