गुन्हे विश्वसामाजिक

आरव केसरे चा निर्घृण खून त्याच्याच वडिलाने केला …: केवळ ४८ तासात गुन्हा उघडकीस


बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव राकेश केसरे (वय ६ वर्षे ) याचा निर्घृण खून त्याचेच वडील राकेश सर्जेराव केसरे (वय २७ वर्षे ) याने केला असल्याचे निष्पन्न झाले असून, स्वत: आरोपीने पोलिसांसमोर हे कबूल केले असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. सदर घटनेचा गुन्हा शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, रविवार दि. ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळ च्या वेळेस आरोपी राकेश व त्याची पत्नी यांच्यात भांडण झाले होते, त्या भांडणातून राग आल्याने त्याने हातोडा फेकून मारला, व यात आरव ला तो लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची कबुली, राकेश याने पोलिसांना दिली.


दरम्यान हा कोणताही नरबळी चा प्रकार नसल्याचेही पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी सांगितले.


सदर गुन्ह्याचा तपास पोलीस खात्याने अवघ्या ४८ तासात लावल्याने पत्रकारांनी पोलिसांचे अभिनंदन केले. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे कर्मचारी करीत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!