” आरव हत्याकांड ” नरबळी कि गुप्तधन कि अन्य काही ? : पोलीस खात्याची कसोटी


बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव केसरे च्या हत्याकांडात आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून, त्या बालकाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न पोलीस खाते करीत आहे. दरम्यान या प्रकरणात सुमारे पाच जनांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.


दरम्यान हे हत्याकांड कोणी केले ? घरातल्यांनी कि बाहेरच्यांनी ? या प्रश्नाचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच हे प्रकरण नरबळी कि, गुप्तधन साठी घडले, कि, अन्य कोणत्या कारणासाठी घडले असावे, यासाठी सुद्धा निश्चित प्रयत्न होत आहेत.


या प्रकरणाने पोलीस खात्याची झोप उडवली असून, पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक तसेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. एकंदरीत यातून त्या चिमुकल्या बाळाला न्याय मिळावा, अशीच अपेक्षा प्रशासन तसेच कापशी ग्रामस्थ व सर्वसामान्य जनता यांची आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!