सवते इथं वीज पडून दोन महिला गंभीर जखमी


बांबवडे : सवते तालुका शाहुवाडी इथं दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान शेतात वीज पडली. या दुर्घटनेत दोन शेतकरी महिला गंभीर जखमी झाल्या असून , त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सौ.सुनंदा कृष्णा पाटील वय ४८ वर्षे , तसेच सौ लक्ष्मी शामराव पाटील वय ५२ वर्षे दोघीही राहणार सवते तालुका शाहुवाडी येथील असून, त्या आपल्या शेतात काम करीत होत्या. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान आलेल्या वळवाच्या पावसासोबत वीज देखील कडाडली. या विजेच्या धक्क्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत.


दरम्यान सरूड आरोग्यवर्धिनी इथं उपचारासाठी नेले असता, यावेळी कुणीही वैद्याकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे समजते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!