शाळेत येताना मलकापूर शिवसेनेने घेतली विद्यार्थ्यांची काळजी


मलकापूर : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील जि.प.च्या कुमार विद्यामंदिर मध्ये थर्मामीटर, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, मास्क चे वाटप शिवसेनेचे दक्षिण संपर्क प्रमुख बाजीराव कळंत्रे व माजी संपर्क प्रमुख यशवंत पाटील यांच्या विशेष पुढाकारातून करण्यात आले.


दीड वर्षांच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली. विद्यार्थ्यांना कधी नव्हे, तो शाळेत जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु विद्यार्थी शाळेत येण्याअगोदर त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणून या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.


मलकापूर शहर शिवसेना व उपशाखाप्रमुख राहुल पवार यांच्या विशेष प्रयत्नातून थर्मल गन आणि ऑक्सिमीटर चे वाटप करण्यात आले.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, दिनकर लोहार, ओंकार बेंडके, आदर्श बोटांगळे, बाळासाहेब बसरे, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!