मणदूर केंद्रांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांची निवड
आरळा ( सागर नांगरे ) : मणदूर तालुका शिराळा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वारणावती शाळेत शाळा व्यवस्थापन समिती मध्ये नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.
मणदूर केंद्रांतर्गत वारणावती शाळेत व्यवस्थापन समिती मध्ये श्री संजय शिवाजी पाटील, श्री गणेश राजाराम चौगले, सौ लक्ष्मी सुरेश भाष्टे, सौ स्वाती संतोष चांदे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.
यावेळी श्री रमण दगडू खबाले, शाळेचे मुख्याध्यापक, श्रीमती प्रीती कृष्णा वास्कर सहकारी शिक्षिका, सौ.संचिता गणेश माने शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, श्री मारुती शामराव पाटील उपाध्यक्ष, श्री शंकर राजाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य मणदूर, श्री कोंडीबा शंकर पाटील, श्री सुरेश पांडुरंग भाष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.