बांबवडे चे श्री विजय लाटकर यांची शाहुवाडी तालुका उपाध्यक्ष पदी निवड
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील विजय कुमार लाटकर यांची शाहुवाडी तालुका उपाध्यक्ष पदी वर्णी लागली, आणि अनेक वर्षांनी बांबवडे नगरी ला न्याय मिळाला.
दि. २९ ऑक्टोबर रोजी शाहुवाडी येथील संकल्प सिद्धी हॉल मध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते श्री विजय लाटकर यांना तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

बांबवडे नगरी त खऱ्या अर्थाने शिवसेना वसली, आणि वाढली सुद्धा. अशा शिवसेनेने या अगोदर एक पांडुरंग वग्रे आबा सोडला, तर बांबवडे ला कधी मोठे पद मिळाले नाही. आजमात्र विजय लाटकर यांच्या माध्यमातून बांबवडे नगरी ला मान मिळाला.

यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, जि.प.सदस्य हंबीरराव पाटील बापू, माजी जि.प. सदस्य नामदेवराव पाटील सावेकर, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तसेच अन्य मान्यवरांसहित अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

याबाबत श्री विजय लाटकर यांचे अभिनंदन आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने आभार.