राजकीयसामाजिक

मनसे चा एसटी कामगार संपाला जाहीर पाठींबा : श्री युवराज काटकर


बांबवडे : राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जाहीर पाठींबा, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांनी, मलकापूर आगार येथील संपावर असलेल्या कामगारांना पाठिंब्याचे पत्र देवून, दर्शविला आहे.
एसटी कामगारांनी आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी संप केला होता. परंतु सध्या हा संप चिघळत असून, कामगारांना पाठिंब्याची गरज आहे. म्हणून मनसे चे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी या एसटी कामगारांना पाठींबा दर्शविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे पाठिंब्याचे पत्र दिले जात आहे. कामगारांना ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल, त्यावेळी मनसे त्यांना निश्चितच सहकार्य करेल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!