मनात ” साहेब ” आणि ध्यानात ” भगवा ” ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे : श्री नामदेवराव गिरी


बांबवडे : अनेक वादळांना धाडसाने तोंड देणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री नामदेवराव गिरी. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत आयुष्याची वाटचाल करणारं हे व्यक्तिमत्व शिवसेनेला भावलं. म्हणूनच त्यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या उपप्रमुख पदी वर्णी लागली. मनात ” साहेब ” आणि ध्यानात ” भगवा ” असणारं हे व्यक्तिमत्वं, आज आपल्या वयाची ३८ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यांच्या या प्रकट दिनाबद्दल त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तुत्वावर टाकलेला एक कवडसा…


नामदेवराव आणि त्यांचे थोरले बंधू सुखदेव या बांधवांचे भगव्यावर नितांत प्रेम. अगदी लहानपणापासून शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात , मोर्चात हि मंडळी नेहमीच सहभागी असायची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या अनुषंगाने होणाऱ्या अनेक कार्यक्रमात यांचा सक्रीय सहभाग असायचा. इतिहास काळातील शस्त्रांचे प्रदर्शन असो, कि, महाराजांची मिरवणूक हि मंडळी नेहमी हजर. त्यातूनच स्व. बाळासाहेब ठाकरे हि प्रतिमा त्यांच्या हृदयात कोरली गेली आहे.


” साहेब ” हे नाव म्हणजे अवघी सेना असा त्यावेळचा शिरस्ता असायचा. अनेक कडू – गोड आठवणी जपत, त्यांचं मार्गक्रमण सुरु आहे. त्यांच्या व्यवसायच्या माध्यमातून उदरनिर्वाह आणि त्यानंतर सगळी शिवसेनाच. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ते नेहमी रस्त्यावर उतरत, तसेच प्रत्येक आंदोलनावेळी, बंद च्या वेळी नामदेवराव सातत्याने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेवून असायचे. आजही शिवसेना आणि शिवसेनाच असंच त्यांचं वर्णन होईल.
स्वातंत्र्यपूर्वकाळात ज्या पद्धतीने क्रांतिकारक लढले, त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्याची सुरुवात अशीच केली होती. आणि नामदेवराव सुद्धा सामान्य जनतेचे प्रश्न घेवून, आपली चळवळीची वाटचाल करीत आहेत. त्यांचा हा मनसुबा पाहता माजी आमदार सत्यजित पाटील आबा आणि त्यंचे जिल्ह्प्रमुख तसेच संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या तरुणाची आत्मीयता ओळखली, आणि त्यांची निवड संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी केली. त्या माध्यमातून नामदेवराव सामान्य जनतेच्या चुलीपर्यंत पोहचले. त्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. आणि त्यांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेना पोहचली पाहिजे, असा त्यांचा मनसुबा आहे. जिथे अनेक पक्ष आपले बस्तान एवढी वर्षे बसवून आहेत, तिथे शिवसेना कायमस्वरूपी राहावी,यासाठी सेनेचे मावळे तयार करण्यात ते नेहमी व्यस्त असतात.
उधाणलेल्या समुद्रात जहाज एकट्याने चालविण्याची क्षमता ठेवणारे हे व्यक्तिमत्वं खरंच गोंडस आणि निगर्वी आहे. अशा या व्यक्तिमत्वाला शिवसेनेने लोकप्रतिनिधित्व करण्याची जर संधी दिली, तर निश्चितच त्याचे परिणाम चांगले होतील. पुनश्च नामदेवराव गिरी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.


जीवन असे उजळावे, कि अवघा समाज प्रकाशात न्हाऊन निघावा,
जीवन असे जगावे , कि जगण्याला सुद्धा अर्थ लाभावा,
” भगवा ” असा फडकावा, कि समर्पणाला देखील धन्यता लाभावी,
” शिवसेना ” अशी बहरावी, कि “शिवा ” ला देखील अभिमान वाटावा …

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!