भविष्यात महाराजांची विटंबना झाल्यास, गंभीर परिणाम होतील- श्रीकांत कांबळे ( भारतीय दलित महासंघ )
बांबवडे : कर्नाटक राज्यातील बंगळूरू इथं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, अशा समाजकंटकांना तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्नाटक सरकार चा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तसेच भविष्यात असे काही घडल्यास महाराष्ट्रात नोकरी धंद्यानिमित्त रहात असणाऱ्या तसेच इथं व्यवसाय करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल. तसेच कर्नाटक मधून येणाऱ्या गाड्या इथं फिरून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री श्रीकांत कांबळे यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं पोलीस चौकीसमोर भारतीय दलित महासंघाच्या वतीने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच सदरच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी भारतीय दलित महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आपल्या राज्याची प्रेरणा नसून अवघ्या देशाचे दैवत आहे. त्यांनी आज शिवाजी महाराज यांच्या केलेल्या विटंबनेने अवघा महाराष्ट्र व्यथित झाला आहे. या गंभीर घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्र वासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पुन्हा अशी घटना घडल्यास , याचे परिणाम गंभीर होतील, याची जाणीव कर्नाटक सरकारने ठेवावी, असेही श्रीकांत कांबळे यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी अमोल कांबळे, बबलू चौगले, चंद्रकांत काळे, आकाश कांबळे, महेश हाळकुंद्रे , दयानंद शिवजातक, विजय हिरवे, पंकज घोलप, जनार्दन कांबळे, अविनाश कांबळे, अविनाश थेरगावकर, किशोर घोलप, विजय सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पोलीस कर्मचारी,तसेच बांबवडे चे पोलीस पाटील संजय कांबळे उपस्थित होते.