केतकी चितळे विरोधात कोल्हापूर पोलिसांना निवेदन : करण देसाई आणि सहकारी
कोल्हापूर प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे ज्येष्ठ नेते शरदश्चंद्र पवार यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मिडिया वर आक्षेपार्ह पोस्ट केली असून, तिच्यावर कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात यावा , अशा आशयाचे निवेदन कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात श्री करण विजयसिंह देसाई आणि सहकारी यांनी दिले आहे.

केतकी चितळे हिने पवारसाहेबांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्यांची बदनामी झाली आहे. तसेच एका दिग्गज नेत्यांवर अशी पोस्ट शेअर करून बदनाम केले आहे. याबाबत तिच्यावर भा.द.म. ५०० ( मानहानी ), ५०१ ( बदनामी कारक बाब छापणे किंवा प्रकाशित करणे ), भा.द.सं. ५०५ (२) कोणतेही विधान किंवा अहवाल वर्गामधील शत्रुत्व किंवा द्वेष किंवा दुर्भावना यांना प्रोत्साहन देण ) या कलमान्वये गुन्हा नोंद व्हावा, अशीही या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान करण विजयसिंह देसाई हे राष्ट्रवादीचे माजी नेते विजयसिंह देसाई यांचे चिरंजीव आहेत. तसेच या निवेदनावर ऋषिकेश काटकर, प्रथमेश जोशी, मुरलीधर खरात या मान्यवरांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत.