अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा पाय तुटला …
बांबवडे : बांबवडे जवळील वाडीचरण जवळ दुचाकीला अज्ञाताने धडक दिल्याने, दुचाकीस्वाराचा पाय तुटला, तर, त्याच्या मागे बसलेल्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान दुचाकी चालकाला कोल्हापूर इथं पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

याबाबत बांबवडे येथील पोलीस चौकीत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत घडलेली हकीकत अशी कि, दुचाकी चालक आकाश अशोक चोपडे ( अंदाजे वय २८ ) राहणार सागाव, तालुका शिराळा जिल्हा सांगली,

हा स्प्लेंडर प्लस क्र.MH 10-CJ- 2360 या वाहनावरून बांबवडे कडून सागाव दिशेला आपला मित्र मयूर मंगेश कांबळे राहणार हुपरी ता. जयसिंगपूर जि. कोल्हापूर याच्यासोबत निघाला होता. दरम्यान सरूड दिशेहून बांबवडे कडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दुचाकीला जोराची धडक दिली. हि धडक एवढ्या जोराची होती , कि या धडकेत दुचाकी चालकाचा पाय तुटून पडला. तर त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. पण या अपघातात धडक दिलेले अज्ञात वाहन मात्र निघून गेले.

दुचाकीस्वार आकाश चोपडे याला कोल्हापूर ला पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे.

पुढील तपास शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.