बंडखोर शिवसैनिकांच्या विरोधात निदर्शने व निषेध
बांबवडे : संपूर्ण महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप सर्वसामान्य शिवसैनिकाला रुचलेला नाही. याचे पडसाद शाहुवाडी तालुक्यात सुद्धा उमटले आहेत. बांबवडे इथं शिवसैनिकांच्या वतीने भर पावसात निदर्शने आज दि.२२ जून २०२२ रोजी करण्यात आली आहेत.

यावेळी तळागाळातील शिवसैनिक तळमळीने हजर होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना पाठींबा देण्यासाठी हे शिवसैनिक आले होते. तर बंडखोर शिवसैनिकांचा त्यांनी निषेध केला आहे.

यावेळी कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी , तालुकाप्रमुख दत्ता पोवार, तालुका उपप्रमुख दिनकर लोहार, सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर, दिप्ती कोळेकर, बाबा पाटील, नितीन माने, सागर माने, आदी कार्यकर्ते व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.