येलूर इथं महिलांच्या उज्वल भवितव्यासाठी एकमेव श्रीमती शोभाताई कोरे महाविद्यालय सज्ज
बांबवडे : येलूर तालुका शाहुवाडी इथं मुलींसाठी श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. इथं मुलींसाठी सर्वार्थाने योग्य शिक्षण दिले जात आहे.

याठिकाणी वारणा शैक्षणिक पॅटर्न राबविण्यात येत आहे. इथं अनुभवी , व तज्ञ प्राध्यापक वर्ग विद्यार्थिनींसाठी उपस्थित आहे. इथं सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा विद्यार्थिनींसाठी उपलब्ध आहेत.

मुलींसाठी असलेल्या या महाविद्यालयासाठी भव्य इमारत उभी आहे. तसेच मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारले आहे. इथं संभाषण कौशल्य व वृद्धीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. इथं परीक्षांचे सातत्य राखण्यासाठी परीक्षा सराव घेतला जातो. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, सामाजिक भान, शिस्त आणि नितीमुल्ये जोपासण्यासाठी प्रयत्न केले जातात. गरीब व होतकरू विद्यार्थिनींसाठी सायकल बँक ची योजना उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच एसटी पास ची सुविधा सुद्धा इथं उपलब्ध करून दिली जाते. खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या इव्हेंट च्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

या महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयासाठी कला, वाणिज्य, आणि विज्ञान साठी प्रत्येकी १२० जागा तर, कनिष्ठ साठी कला, वाणिज्य, विज्ञान साठी सुद्धा प्रत्येकी १०० जागा उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थिनींनी या महाविद्यालयात प्रवेश घेवून, आपले भविष्य उज्वल करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. इथं शिवाजी विद्यापीठ चे दूर शिक्षण अभ्यास केंद्र सुद्धा उपलब्ध आहे.

हे महाविद्यालय वारणा शिक्षण मंडळ चे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनानुसार सक्रीय आहे.

अधिक माहिती साठी डी.एस.पोवार ८९७५८९२४२४, आर. एस. पाटील ९६५७४९१९०२, एस.एम. पानकर ९४०३८३४५४३ यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन सुद्धा महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे.