लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक शाळेत ” आंतरराष्ट्रीय योग दिन ” संपन्न


बांबवडे : शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.


शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यां कडून योगसाधनेची प्रात्यक्षिके मोठ्या उत्साहात करण्यात आली. योग प्रशिक्षण देण्यासाठी योग गुरु श्री निखील साळुंखे यावेळी उपस्थित होते.


त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांसमवेत योग प्रात्यक्षिके संपन्न झाली. योग साधनेचा माणसाच्या अरीग्याच्या दृष्टीने खूप फायदा होतो. त्यामुळे जीवनात योगसाधनेला खूप महत्व आहे.


त्यांच्यासोबत सह. शिक्षक अभय साळुंखे तसेच सर्व शिक्षकांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली.


योग गुरूंचे स्वागत मुख्याध्यापक गवळी डी. पी., यांनी केले यावेळी कांबळे आर.एस., खबाले वाय. व्ही., सौ.भोसले एस.एस., संग्राम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!