साळशी च्या श्री शंभू महादेव माध्य. विद्यालयाचा १०० % निकाल : ग्रामस्थांकडून कौतुक
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील श्री शंभू महादेव विद्यालय चा एसएससी परीक्षेचा निकाल १०० % लागला असून, या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.

ग्रामीण भागात सुरु असलेली शाळा अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गावात राजकारण सहित समाजकारण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. गावात धार्मिक आणि सामाजिक नितीमुल्ये जपली जातात. याचबरोबर शैक्षणिक प्रगती सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. शाळेचे संस्थापक श्री महादेवराव ज्ञानदेव पाटील हे माजी शैक्षणिक सभापती आहेत. त्यामुळे शाळेची प्रगती निश्चितच होत आहे.

दरम्यान शाळेचा निकाल १०० लागला असून, प्रथम क्रमांक भक्ती बाबासाहेब पाटील ( ९०.८० ), द्वितीय क्रमांक श्रेया प्रशांत पाटील (८८.८० ), तृतीय क्रमांक रेश्मा तानाजी पाटील (८७.४० )एवढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

यासाठी महादेव ज्ञानदेव पाटील मा. सभापती ,मुख्याध्यापक एस.एस. खोराटे सर्व शिक्षक वृन्द्वार्ग शिक्षक व्ही.बी. कांबळे व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचं त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.