ग्रामीण अर्थकारणाला गती देण्यासाठी तालुकास्तरावर विक्री केंद्र – बिडीओ श्री अनिल वाघमारे
मलकापूर प्रतिनिधी : ” उमेद ” च्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी, बचत गटाच्या उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, तालुकास्तरावर विक्री केंद्र उपलब्ध केल्याचे शाहुवाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री अनिल वाघमारे यांनी जाहीर केले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत शाहुवाडी पंचायत समितीच्या आवारातील डेमो हाऊस मध्ये ” कॉप शॉप ” च्या उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर, सांख्यिकी विस्तार अधिकारी, श्री कारंडे, कक्ष अधिकारी श्री ढोबळे, केंद्र प्रमुख राजेंद्र लाड, संभाजी लोहार, श्रीमती कोरडे अधीक्षक, श्री पळसे बीएम., श्रीमती किटे, श्रीमती. पाटील,श्री. वास्कर, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता श्रीमती क्षीरसागर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनस्वी बचत गटाने उत्पादनांची मांडणी केली होती.