मानोली इथं सापडलेल्या पत्र्याच्या पेटीतील मृतदेहाचा आरोपी अटक : शाहुवाडी पोलिसांची धडक कारवाई
बांबवडे (विशेष प्रतिनिधी दशरथ खुटाळे ) : आंबा जवळील मानोली तालुका शाहुवाडी येथील रातआंबी पाणी च्या झुडपात एका पत्र्याच्या पेटीत एका अनोळखी महिलेचे प्रेत २० मार्च २०२२ रोजी शाहुवाडी पोलिसांना आढळून आले होते. त्या महिलेचा कोल्हापूर येथील गोकुळ शिरगाव येथील दत्त कॉलनी मध्ये राहणाऱ्या सविता राजू निरलगे वय ३० वर्षे या महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने गळा आवळून खून केला होता. असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शाहुवाडी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.

दरम्यान शाहुवाडी पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केल्याबद्दल शाहुवाडी पोलिसांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन.

दरम्यान २० मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मानोली गावाच्या हद्दीतील झुडपात पत्र्याची पेटी सापडली होती. त्या पेटीत अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. हि महिला अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील असावी. चेहरा पूर्णपणे कुजल्यामुळे विद्रूप झाला होता. तसेच प्रेताला अळ्या लागलेल्या असून, प्रेत अर्धनग्न अवस्थेत पेटीत होते. तोंडात ओढणीने बोळा कोंबला होता. तसेच गळ्याभोवती पांढरट रंगाची ओढणी गुंडाळलेली होती. डाव्या हाताच्या करंगळी जवळ Praveen असे गोंदलेले होते. सदरच्या घटनेची फिर्याद दत्तात्रय धोंडीबा गोमाडे वय ५६ वर्षे राहणार मानोली तालुका शाहुवाडी यांनी दिलेली होती.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, मयत महिला हि कोल्हापूर येथील व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, रेल्वे स्टेशन, पद्मा टॉकीज या परिसरात वेश्या व्यवसाय करीत होती, असें प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची महिला नेमकी कुठे राहणारी आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. परंतु सदर ची महिला, इतर महिलांपेक्षा सुंदर असून, ती स्वत:कडे अधिक गिऱ्हाईक आकर्षित करते व आपला व्यवसाय वाढवते, या रागापोटी संबंधित वेश्या व्यवसायातील महिला सविता राजू नरलगे(वय ३० वर्षे हिने स्वत:च्या साथीदाराच्या मदतीने हा खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत बंद करून मानोली तालुका शाहुवाडी गावाच्या हद्दीतील जंगलात टाकून दिली. अशी माहिती तपासात प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाली आहे.

सदरच्या प्राथमिक तपासात आरोपीला अटक केल्याबद्दल शाहुवाडी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक विजय पाटील तसेच शाहुवाडी पोलीस कर्मचारी वृंदाचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.