” इथं लाभाताहेत उज्वल भविष्याला प्रगतीचे पंख ” – लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर


शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा इथं उगवतेय उज्वल भविष्याच्या , ज्ञानार्जनाची पहाट. इथं निर्माण होतेय संस्कारांचं नवं दालन. इथं घडवली जातायत लाल मातीच्या आखाड्यातील पैलवान, आणि इथं निर्माण होताहेत खेळाच्या मैदानातील नवीन खेळाडू. हे संकुल म्हणजे ” लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर ” चिखली तालुका शिराळा,जिल्हा सांगली.


शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे पासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर हे ज्ञानसंकुल कार्यरत आहे. इथं बालवाडी ते आठवी पर्यंत शाळा सध्या सुरु आहे. भविष्यात १० वी चे वर्ग निश्चितच निर्माण होतील. अनुशासन आणि शिक्षण यांची उत्कृष्ट सांगड घालत संस्कारांची सुद्धा जोपासना इथं केली जातेय. लाल मातीला सुद्धा हुंकार भरावा, यासाठी शड्डू ठोकणारे छोटे पैलवान निर्माण करण्याचा देखील प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू याच मातीत घडावा, यासाठी सुद्धा संस्था आग्रही आहे.


हे करत असताना विद्यार्थ्यांच्या अंगातील कला गुणांना वाव देण्यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन होतेय. तर या मातीतील संतसज्जनांची परंपरा सुद्धा छोट्या वारकऱ्यांच्या प्रतीकात्मक दिंडीने जोपासली जाते. यावेळी अनेक रखुमाई डोईवर तुळस घेतात, अनेक लहानगे एकनाथ, नामदेव, तुकाराम बनतात. या उपक्रमांना देखील इथं संधी दिली जाते.


दरम्यान शाळेचे अनेक उपक्रम राबवीत असताना, थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. पावसाळ्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं राबविला जातो. इथं वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठावर उभे करण्याचा प्रयत्न १५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या स्पर्धांच्या माध्यमातून केला जातो. शिक्षक दिन साजरा करून, विद्यार्थ्यांनी उपकृत होण्याचा पायंडा इथं पडला जातो. शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी स्कॉलरशिप , पाठांतर स्पर्धा, वाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कला जोपासण्याचा प्रयत्न सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून जोपासले जातात.


इथं विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज इमारत, तज्ञ शिक्षक वृंद इथं विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी सज्ज आहेत. प्रशस्त क्रीडांगण, क्रीडा साहित्य विद्यार्थ्यासाठी पुरवले जातात. इथं अद्यावत वर्ग खोल्या, नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम , अभ्यासासाठी शाळेतच पूर्ण व्यवस्था मार्गदर्शन केले जात आहे. हे सगळं करतच पालकांशी वयैक्तिक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न शाळा करीत आहे. इथं विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सुद्धा उत्तम व्यवस्था संस्थेने केली आहे.


शाळेची हि उपयोगिता असताना पालकांनी आपले विद्यार्थी या संकुलात पाठविण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी संपर्क साधण्यासाठी गवळी सर ९५२७१०६७६५, कांबळे सर ९७३०१६०६४४, खबाले सर ९६०४७५६७७६,भोसले मॅडम ९५६१९३७४७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात येत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!