हारुगडेवाडी इथं बेकायदेशीर मुरूम उत्खनन होतेय – योगेश हारुगडे
बांबवडे : हारुगाडेवाडी तालुका शाहुवाडी इथं रॉयल्टी न भरता मुरूम काढला जात असल्याची, तक्रार योगेश हारुगडे यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याकडे केली असून, यावर प्रशासनाने लक्ष देवून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा हारुगडे यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये मधुकर आकाराम जासूद,तसेच विलास आकाराम जासूद यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

हारुगडेवाडी इथं मधुकर जासूद, तसेच विलास जासूद हे बेकायदेशीररीत्या मुरूम काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, बेकायदेशीर उत्खनन होत आहे. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालून, पर्यावरणाची लुट थांबवावी, अशा आशयाची तक्रार येथील योगेश हारुगडे यांनी केली आहे.