सामाजिक

सौरभ शेट्टी यांची शिवराष्ट्र ग्रुप सोबत पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती


मलकापूर प्रतिनिधी : शिवाराष्ट्र ग्रुप च्यावतीने काढण्यात आलेली पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती ची सांगता पावनखिंड इथं झाली. या पदभ्रमंती मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ राजू शेट्टी सहभागी झाले होते. हि पदभ्रमंती तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली होती.


तीन दिवसांच्या या मोहिमेत अनेक शिवभक्तांनी सहभाग घेतला होता.


हि पदभ्रमंती तीन दिवसांपूर्वी पन्हाळा येथील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरु झाली होती. त्याची सांगता पावनखिंड इथं झाली. या दरम्यान नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची प्रेरणा घेवून मर्दानी खेळांचे प्रदर्शन करीत हि भ्रमंती सुरु झाली होती. शाहुवाडी तालुक्यातील खोतवाडी इथं मुक्कामी असताना, तेथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होणारा त्रास सौरभ शेट्टी यांना सांगितला. खेड्यातील मुलांना सोयीस्कर शिक्षण मिळावे, याकरिता उपाय देखील सुचविले. तेंव्हा शिवराष्ट्र हायकर्स तर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व शैक्षणिक वस्तू भेट देण्यात आल्या.


या तीन दिवसांच्या प्रवासादरम्यान शाहुवाडी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी झाल्या. भात शेती करताना चिखलणी करणे, रोप लावण करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत सहभाग घेता आला. त्याचा आनंद काही वेगळाच होता.असेही सौरभ शेट्टी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांना जेंव्हा कळाले कि, मी राजू शेट्टी यांचा मुलगा शेतातून, जंगलातून पदभ्रमंती करतोय, माझे कपडे भिजलेले आहेत. तेंव्हा त्यांनी स्वत:च्या घरातून चहा करून आणून दिला. हे प्रेम निश्चितच वेगळे होते, आपलेसे करणारे होते. यावेळी त्यांनी, आमच्याशी खूप गप्पा मारल्या.


या प्रवासादरम्यान माझ्यासोबत तानाजी मालुसरे यांचे थेट १३ वे वंशज मा.श्री रायबा मालुसरे, नागपूर जिल्हा न्यायालयाचे बाळासाहेब कदम साहेब, स्वप्नील इंगळे, उत्क्रांत किटे, ऋषी गायकवाड आदी मान्यवर मंडळी आमच्या सोबत होती. असेही श्री सौरभ शेट्टी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!