तारुण्याची समाज भरारी म्हणजे ” भरतराज भोसले सरकार ” यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


बांबवडे : सध्या तरुणाई वेगवेगळ्या आमिषांकडे वळत आहे. कोण सोशल मिडीयावर तर, कोण निवांत आयुष्य अनुभवण्यात मग्न आहे. परंतु काही तरुणाई या सगळ्यांपासून अगदी वेगळी आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण ऐन तारुण्यात दुसऱ्याची भूक जाणणारी, दुसऱ्यांच्या वेदना जाणणारी, दुसऱ्यांचे दु:ख आपलं मानून ते निवारण करण्यासाठी उपाय योजना करीत असते. अशी पिढी देखील शाहुवाडी तालुक्यात आहे, हे निदर्शनास येत आहे. या तरुणाई चा म्होरक्या असणारे भरतराज भोसले सरकार , शाहुवाडी तालुक्यातील रेठरे गावचे रहिवाशी असलेलं , हे व्यक्तिमत्व जाणून घेणे,गरजेचे आहे. दि.४ ऑगस्ट म्हणजेच उद्या त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त भरतराज भोसले यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आणि त्यांच्या भावी आयुष्याला सुद्धा मनापासून शुभेच्छा.


हे व्यक्तिमत्व अवघ्या ३२ वर्षांचं आहे. शैक्षणिक दृष्ट्या उच्च पदवीधर असून, ते Mtech mechanial आहेत. या वयात तरुण मंडळी फिरण्यात,मौज मजा करण्यात व्यस्त असतात. परंतु भारतराज मात्र आपल्या विचारांच्या तरुणाई ची मोट बांधून समाजातील दु:खे शोधण्यात धन्यता मानतात. केवळ दु:खे शोधायची नाहीत, तर त्यावर उपाय योजना करायची ,हाच त्यांचा ध्यास आहे. ग्रामीण भागात समाजकारणाची अत्यंत गरज आहे. त्यातल्या त्यात दुर्गम भागात तर अतिशय गरज आहे. कारण शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचायला खूप वेळ लागतो. यासाठी आरोग्याची नितांत आवश्यकता भासते. त्यासाठी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, यांचे नियमित आयोजन भरतराज करीत असतात. याचबरोबर गरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप, अनाथ मुलांना दिवाळी चा फराळ वाटप करणे, आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे, असे अनेक उपक्रम हे नेहमीच करीत असतात. तसेच गरिबांना अन्नधान्य वाटप करणे, असे दिन दलितांसाठी अनेक उपक्रम हि व्यक्ती आपल्या समाजकारणातून करीत आली आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना वीज मीटर वाटप मोफत केले आहे. पूर परिस्थिती च्यावेळी लोकांना अन्नधान्य , तसेच इतर जीवनावश्यक साहित्य मोफत वाटप केले आहे. त्यावेळी ताडपदरी वाटप अशा अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी केले आहेत. याचबरोबर आपल्या तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे जतन करणे, आणि त्यांची स्वच्छता करणे, तसेच याविषयी जनजागृती करणे, अशी सामाजिक कामे सुद्धा भारतराज आपल्या संकल्प जनसेवक प्रतिष्ठान च्या माध्यमातून वर्षभर करीत असतात.
एवढेच नव्हे तर भूक लागलेल्या चिमुकल्यांची भूक ओळखण्याची त्यांची शैली मनाला भावते.


डोंगर भागात असलेलं ग्रामीण जिवन झाडाझुडूपांवर अवलंबून असते. सध्या ग्रामीण भागात वृक्षारोपणाची अत्यंत गरज आहे. त्या अनुषंगाने परिसरात वृक्षारोपण केले जाते. ग्रामीण भागात खेळ, कुस्ती आदी गोष्टी सुद्धा घडत असतात. अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते सहभाग घेतात. म्हणून तरुणाई त्यांच्यासोबत असते.


त्यांचे आजोबा कै. रावसाहेब भाऊसाहेब भोसले सरकार हे सुद्धा सामाजिक कार्यात असायचे. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून, त्यांनी स्वत:ला समाज कार्यात झोकून दिले आहे. शाहुवाडी येथील आश्रम शाळेला ते नेहमीच मदत करत असतात. तसेच पंढरी च्या वारकऱ्यांना सुद्धा फराळ वाटप करणे, गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप करणे,अशी अनेक सामाजिक कामे ते संकल्प जनसेवक संस्थेच्या माध्यमातून करीत आले आहेत.


असं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व उद्या ४ ऑगस्ट ला ३२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भारतराज भोसले सरकार गेल्या अनेक वर्षांपासून गायकवाड घराण्यावर प्रेम करीत आले आहेत. परंतु याचबरोबर समाजकारणा मध्ये मात्र कानसा खोऱ्यात त्यांचे चांगले नाव आहे.
अशा या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!