बांबवडे जि.प. मतदारसंघाचे बिगुल वाजले : रणवीरसिंग सरकार यांच्या उमेदवारीची मागणी


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड सरकार यांच्या उमेदवारी जाहीर मागणी करण्यात आलीआहे. यातूनच जिल्हा परिषद निवडणुकीचे पहिले बिगुल वाजले आहे.


याबाबत उदय सह. साखर कारखाना कार्यस्थळावर नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या उमेदवारीची एक मताने मागणी करण्यात आली.


कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची उपस्थिती होती. याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांची सुद्धा उपस्थिती महत्वाची होती.


यावेळी दोन्ही नेत्यांनी आणखी कोण, कोण इच्छुक आहेत. याची कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आली. तेंव्हा सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी रणवीरसिंग गायकवाड सरकार यांच्या उमेदवारीला एकमताने समर्थन देण्यात आले आहे.


गेली दहा वर्षे मतदारसंघातील त्यांचा असणारा अफाट जनसंपर्क, विधायक काम करण्याची पद्धत, तसेच ते प्रत्येकाच्या सुखदुखात नेहमीच सहभागी होत असतात. तसेच तरुणाईत त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रणवीरसिंग गायकवाड सरकार यांची बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उमेदवारी ची मागणी केली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!