महिलांच्या व्याधींवर हमखास उपचार :आनंद हॉस्पिटल डॉ. मनोज नाईक
बांबवडे बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आनंद हॉस्पिटल च्या माध्यमातून महिला वर्गासाठी योग्य चिकित्सा आणि अचूक निदान करण्यात येते. या आनंद हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ मनोज नाईक जे एम.एस.,(स्त्री रोग तज्ञ / प्रसूती तज्ञ) आहेत. महिलांना वेदनेपासून मुक्त करण्यासाठी आम्ही चोवीस तास सज्ज आहोत, असे मत डॉ. मनोज नाईक यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले. हे आनंद हॉस्पिटल बांबवडे येथील पिशवी रोड वर ज्योतिर्लिंग बझार च्यावर आहे. याची रुग्णांनी नोंद घ्यावी .

आनंद हॉस्पिटल मध्ये इतर आजारांवरही माफक दरात उपचार केले जातात. महिलांसाठी अनेक सुविधा इथं निर्माण केल्या आहेत. प्रसूतीपूर्व चिकित्सा, सुश्रुषा प्रसूतिगृह, स्त्री रोग चिकित्सा, स्त्री रोग शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन सल्ला, गर्भ पिशवी शस्त्रक्रिया आदी सुविधा इथं माफक दरात पुरविल्या जातात. वेदनारहित प्रसूती, सिझेरियन प्रसूती, वंध्यत्व चिकित्सा, माफक दरात केल्या जातात. तसेच महिलांच्या शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज शस्त्रक्रिया गृह उपलब्ध आहेत.

आनंद हॉस्पिटल मध्ये लसीकरण, आहारविषयक सल्ला देखील डॉ. मनोज नाईक यांच्याकडून दिला जातो. योग्य शिक्षित परिचारिका, परिचारक तसेच कर्मचारी वृंद इथं उपलब्ध आहे.

यासाठीच वेदनाग्रस्त महिलांनी आनंद हॉस्पिटल ला भेट द्या. अधिक माहितीसाठी या मो. क्र.९७६६८०७४७५, ९७६५७३८३३३ वर अवश्य संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. मनोज नाईक यांनी केले आहे.