राजकीयसामाजिक

” पक्ष तर पक्ष, नाही तर अपक्ष ” : सरूड पंचायत समिती साठी संपत पाटील यांची उमेदवारी मागणी


सरूड : शाहुवाडी तालुक्यातील सरूड पंचायत समिती गणासाठी खुला प्रवर्ग आरक्षण पडले आहे. शिंपे तालुका शाहुवाडी येथील संपत पाटील हे या मतदारसंघातून इच्छुक असून, तरुणाई चा मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठींबा असल्याचे सोशल मिडीयावरून निदर्शनास येत आहे.


संपत पाटील हे माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे समर्थक आहेत. यासाठी त्यांनी आम. सत्यजित पाटील आबा यांच्याकडे देखील उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांना उमेदवारी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. असे मत संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली .दरम्यान सोशल मिडिया वरून पोस्ट व्हायरल होत आहे कि, ” पक्ष तर पक्ष , नाहीतर अपक्ष ” . यावरून संपत पाटील मोठ्या प्रमाणावर पाठींबा गोळा करण्यात यशस्वी झाले आहेत.


संपत पाटील एक तरुण व्यक्तिमत्व असून, प्रामाणिक असल्याने नवे व्यक्तिमत्व राजकीय पटलावर येण्यास काय हरकत आहे, असे नागरिकांचे मत आहे. अवघी तरुणाई देखील त्यांच्या या निर्णयावर भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे.


याचबरोबर गावातील अनेक सामाजिक कामात त्यांचा यशस्वी सहभाग असतो. यासाठी ते अनेकवेळा स्वखर्चातून सामाजिक कामात सहभाग घेतात. त्यांच्या या सामाजिक कामांमुळे च त्यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी होत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!