शव विच्छेदन ची खोली नगरी वस्तीपासून दूर बांधावी,अन्यथा काम थांबविण्याचा इशारा – विजय लाटकर शिवसेना तालुका उपप्रमुख
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची खोली, जवळच असलेल्या अवचित वगर ला लागून आहे. सध्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधणी सुरु असून, शव विच्छेदन ची खोली नागरी वस्ती पासून लांब बांधावी, अन्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने हे बांधकाम आंदोलनाच्या माध्यमातून थांबविण्यात येईल, असा इशारा देणारे , निवेदन शिवसेनेचे तालुका उप प्रमुख विजय लाटकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहे.

बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पूर्वी असणारी शव विच्छेदन ची खोली अवचित नगर ला लागून होती. त्यामुळे येथील नागरी वस्तीमध्ये दुर्गंधी पसरलेली असायची. त्याचा येथील नागरिकांना त्रास व्हायचा.

सध्या जुने प्राथमिक आरोग्य केंद्र निर्लेखन करून, इथं नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र उभं रहात आहे. तेंव्हा हे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधताना, ते अवचित नगर च्या विरुद्ध दिशेला बांधण्यात यावे. जेणेकरून येथील नागरी वस्तीतील जनतेला दुर्गंधी चा त्रास होणार नाही.

जर आहे त्याठिकाणी बांधकाम बांधावयाचे असेल, तर येथील ग्रामस्थांना अन्यत्र जागा द्यावी. या निवेदनाचा गांभीर्याने विचार न झाल्यास , येथील ग्रामस्थ आरोग्य केंद्राचे बांधकाम आंदोलनाच्या माध्यमातून थांबविण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख श्री विजय लाटकर यांनी दिला आहे.

यावेळी सचिन मुडशिंगकर, स्वप्नील घोलपे, रोहन लांडगे, अभिजित बेंद्रे, अर्जुन शिंदे, सोयब मुल्ला, दिलखुष शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते.