ह.भ.प.वासुदेव चौगुले (आप्पा )यांचे निधन :रक्षाविसर्जन रविवार दि.११/९/२०२२ रोजी स. १०. वाजता
बांबवडे प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे नगरीतील ज्येष्ठ आणि बुजुर्ग व्यक्तिमत्व असलेले ह.भ.प. वासुदेव कृष्णा चौगुले ( आप्पा ) यांचे आज दि. ०९ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे वयाच्या ८२ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांना मुकुंद पवार ,तसेच साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

स्व.ह.भ.प. वासुदेव चौगुले हे बांबवडे नगरी तील बुजुर्ग व्यक्तिमत्व. नेहमीच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. अनेक धार्मिक कार्यात यांचा मोठा सहभाग होता. भजन, कीर्तन, प्रवचन अशा धार्मिक कार्यात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अशा या बुजुर्ग व्यक्तिमत्वास अवघी बांबवडे नगरी मान देत होती, आणि देत राहील, याबाबत शंका नाही.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून , नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० बांबवडे मळा इथं आहे.