जिद्द,आणि चिकाटी च्या जीवावर सलून व्यावसायिकाची कन्या अनुजा शिंदे चे उज्वल यश
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथील अनुजा महेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने कॉम्प्यूटर इंजिनिअर ची पदवी ९६ % गुण मिळवीत उत्तीर्ण झाली असून, तिची ‘ कँपस ‘ च्या माध्यमातून दोन कंपनीमध्ये नोकरी साठी निवड झाली आहे. याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

कष्ट, जिद्द, आणि चिकाटी या गुणांवर तिने यशाची झेप घेतली आहे. यासाठी तिचे वडील महेंद्र शिंदे या सलून व्यावसायिकाने तिला दिलेला आत्मविश्वास हासुद्धा तिच्या यशाचा पाया आहे. मलकापूर इथं महेंद्र शिंदे हे आपला सलून व्यवसाय चालवीत आहेत.

प्राथमिक विद्यामंदिर पासून अनुजा शिंदे हिने आपली गुणवत्ता तयार केली असून, इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षापर्यंत आपल्या कष्टाचा आणि गुणवत्तेचा आलेख तिने चढता ठेवल्यामुळेच तिला इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षात तिला ९६ % गुण मिळवता आले.

घरची बेताची असलेली आर्थिक स्थिती, वडिलांच्या सलून व्यवसायात मिळवलेल्या तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर कुटुंबाची सर्व जबाबदारी आहे. हि परिस्थिती अनुजा लक्षात ठेवून, कष्ट व जिद्दीच्या जीवावर पदवी परीक्षेत अभ्यास करत होती. तिच्या या कष्टाची परतफेड तिला या गुणवत्तेच्या माध्यमातून झाली आहे.

जिद्द आणि चिकाटी असली कि, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यश मिळवता येते, असे मत प्रतिपादन अनुजा शिंदे यांनी एसपीएस न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान तिच्या या यशाबद्दल शाहुवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ च्या वतीने संस्थापक अध्यक्ष विनायक हिरवे यांच्या हस्ते अनुजा शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.