” एफआरपी चा जागर ” सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – सागर शंभू – शेटे


बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी इथं ” जागर एफआरपी चा ” या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर सभा दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी संबोधित करणार आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या जाहीर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन सागर शंभू शेटे यांनी केले आहे.


१५ ऑक्टोबर २०२२ रोजी जयसिंगपूर इथं होणाऱ्या ऊस परिषदेला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येत आहे. त्यासाठीच या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी. या मुख्य मागणीसाठी हि ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे.


त्याच्या निमंत्रणासाठी उद्याची जाहीर सभा सरूड इथं संपन्न होणार आहे. यासाठी गावोगावी फिरून सागर शंभू शेटे व कार्यकर्ते शेतकऱ्यांना आवाहन करीत आहेत.


यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष सागर शंभू शेटे, शाहुवाडी- पन्हाळा संपर्क प्रमुख वसंत पाटील, तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, जिल्हा युवा सरचिटणीस पद्मसिंह पाटील, शाहुवाडी तालुका उपाध्यक्ष रामभाऊ लाड, तालुका युवा सरचिटणीस गुरुनाथ शिंदे, रायसिंग पाटील, अजित पाटील, नांदणी, मिलन पाटील संभाजीपूर, शिवाजी पाटील सावे, संतोष पाटील सावेआदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!