स्वत:साठी जगताना,दुसऱ्यांसाठी जगून पहा – श्री विजयराव बोरगे पैलवान


बांबवडे प्रतिनिधी : ज्या ज्या वेळी समाजकारणाला कोणी वाली उरत नाही, अशावेळी कोणी न कोणी अवलिया याच समाजातून निर्माण झालेला आहे. हा इतिहास आहे. याचप्रमाणे पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघातून पैलवान विजयराव बोरगे हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले, आणि समाजकारणाला खऱ्या अर्थाने धार आली. तलवार कितीही चांगली दिसली,तरी तिच्या धारेशिवाय तिला किंमत नाही. त्यामुळे या मतदारसंघात बोरगे पैलवान यांनी समाजकारणाचा डोंगर उभा करीत तालुक्यातील जनतेला एक नवा आदर्श घालून दिला आहे. आणि समाजकारणाची धार काय असते,ते आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्या विजयराव बोरगे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित समाजकारणाचे शिवधनुष्य पेललेल्या लोकप्रतिनिधीला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.


एकेकाळी मितभाषी असणारे विजयराव बोरगे समाजाच्या कामात एवढे स्वत:ला वाहून घेतील, असे वाटले नाही. परंतु या व्यक्तिमत्वाने आपली समाजकारणाची मुद्रिका स्वकर्तुत्वातून उठवली आहे. बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र इथं येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत हि जागा आणि सुविधा अपुऱ्या वाटत होत्या. त्याठिकाणी आरोग्यकेंद्राची मोठी इमारत पाहायला मिळत आहे. आपला भाग दुर्गम आहे. त्यामुळे येथील तरुण वर्ग पुणे मुंबई इथं नोकरी व्यवसायानिमित्त राहतात. आई-वडील गावी असतात. अशावेळी काही दुखद घटना घडली, तर ते शव ठेवण्यास आपल्याकडे तरतूद नाही. यासाठी शीतपेटी ची सुविधा हि तालुक्यात प्रथमत:च विजयराव बोरगे यांनी उपलब्ध करून दिली.अशा एक न अनेक कामे त्यांनी समाजासाठी केली आहेत.


स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू दिव्यांग लोकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आजच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांनी केले आहे. आयुष्यात नेहमीच आपण स्वत:साठी जगतो, कधी तरी दुसऱ्यांसाठी जगून पहा.खूप समाधान मिळते, असे त्यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!