बांबवडे ग्रामपंचायत च्यावतीने दिव्यांग निधी चे वाटप
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी ग्रामपंचायत च्यावतीने दिव्यांग निधीचे बांबवडे इथं वाटप करण्यात आले.

बांबवडे इथं गावातील दिव्यांग व्यक्तींना आर.ओ. वॉटर सिस्टम व ३०००/- रु.रोख रक्कम स्वरुपात या निधीचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी येथील मा. जि.प.स. विजयराव बोरगे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते २८ दिव्यांग व्यक्तीना या निधीचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी बांबवडे चे सरपंच श्री.सागर कांबळे, उपसरपंच श्री.सयाजी निकम, सदस्य सर्वश्री विष्णू यादव, सुरेश नारकर, अभय चौगुले, सतीश कांबळे, सौ. संगीता बंडगर, स्वाती मूडशिंगकर, संगीता कांबळे, सौ. सावित्री बंडगर, सौ. पूजा बंडगर, सौ. मनिषा पाटील , ग्रामसेवक आर.बी. कुरणे, लिपिक दिपक पाटील, प्रकाश निकम, सचिन मूडशिंगकर व लाभार्थी उपस्थित होते.