घुंगुरवाडी येथील जमिनीच्या वादात दोन जन जखमी
मलकापूर प्रतिनिधी : घुंगुर पैकी घुंगुरवाडी तालुका शाहुवाडी इथं जमिनीच्या, आणि जुन्या घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात दोनजण गंभीर जखमी झाले असून, जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाणे इथं नोंद करण्यात आली आहे.

घुंगुर पैकी घुंगुरवाडी इथं चुलत भाऊ व चुलत पुतणे यांची जमिनीच्या वाटणीवरून तसेच जुन्या घराच्या वाटणीच्या कारणावरून वाद होता.दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजनेच्या दरम्यान दिलीप श्रीपती खोत वय ३३ वर्षे यांच्या राहत्या घरात आनंदा आप्पाजी खोत, अंकुश आनंदा खोत, संतोष नारायण खोत सर्व राहणार घुंगुरवाडी यांनी ,येवून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पट्टी, लाकडी काठी ने मारहाण केली.

या मारहाणीत शहाजी बाळू खोत, सोनाबाई श्रीपती खोत या जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची फिर्याद दिलीप श्रीपती खोत यांनी शाहुवाडी पोलीस ठाणे येथे दाखल केली. सदर गुन्ह्याचा तपास पोसई पांढरे करीत आहेत.