बांबवडे ग्रामपंचायत मध्ये ” भगवा ” फडकणार- श्री विजय लाटकर
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले. आणि गावातील अनेक नवे चेहरे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार झाले आहेत. कोण कोणत्या पॅनेल मधून निवडणूक लढतील, हे अद्याप जरी ठरले नसले, तरी या ग्रामपंचायत निवडणुकीत नवे चेहरे समोर येणार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे विजय लाटकर हा एक नवा चेहरा समोर येत आहे.

श्री विजय लाटकर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख असून,त्यांना सामाजिक कार्यातून आपली सामाजिक बांधिलकी दाखवायची आहे. म्हणूनच त्यांनी या निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले असल्याचे त्यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, बांबवडे ग्रामपंचायत च्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहे. कारण बांबवडे गाव एक मोठी बाजारपेठ असून हि, इथं सार्वजनिक शौचालय नाही. कचरा उठविण्यासाठी व्यवस्था नाही. अशा अनेक उणीवा अद्यापही पूर्ण करावयाच्या आहेत.

त्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरत आहोत. शिवसेनेचा भगवा आपल्या हातात घेवून, निवडणूक रिंगणात उतरून शिवसेनेचा एक नवा चेहरा ग्रामपंचायत च्या माध्यमातून पुढे येईल, आणि ग्रामपंचायत मध्ये भगवा फडकेल, असा आशावाद श्री विजय लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केला.